हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद राज्यपालांच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पेटला आहे. यावरून काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. त्याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर निशाणा साधला आहे. “महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही!, असे म्हणत दरेकर यांनी मालिकांना टोला लगावला आहे.
काल महाविकास आघाडीने राज्यपालांच्या दौऱ्यावर आक्षेप घेत राज्यपालांकडून सत्तेची 2 केंद्रे बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे असे म्हंटले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांवर अनेक आरोपही केले. त्याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर निशाणा साधला आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही ! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक जी त्यांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या ! नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील, असा खोचक टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला आहे.
महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही!मा. @nawabmalikncp जी
त्यांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या!
नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील.— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 3, 2021
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे आता पण त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असेल पण त्यांना कळलं पाहिजे कि ते मुख्यमंत्री नाहीत, असाही टोला लगावला होता.