हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावरमधील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर विधानसभा निवडणुकीवरून टीका केली. “या राज्यातली जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगा फटका करून अमर, अकबर, अँथनीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, 2024 मध्ये भाजप स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करून दाखवू, अशी टीका दानवे यांनी केली.
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत भाजप सत्तेवर असताना जेव्हा कामगारांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विविध मागण्या केल्या. त्यावेळी मुनगंटीवार काय म्हणाले. त्याची अर्धवट क्लिप दाखवली जाय आहे. त्यांचीच क्लिप आपण बघितली. पण उद्धव ठाकरे यांची देखील सर्वांनी क्लिप बघावी. एका क्लिपमध्ये ठाकरे म्हणतात, आमच्या राज्यात एकही संप होणार नाही. अन्यथा आमचा मंत्री जाऊन समाधान काढेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या क्लिपची देखील दखल घेतली पाहिजे. या महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रमाणे धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती दिल्या आहेत. त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सवलती द्याव्यात. त्रिपुरा मध्ये मस्जिद पडली. याबाबत तेथील अतिक्रमण काढावेत असे खुद्द आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मात्र, त्रिपुराचे पडसाद मालेगाव,अमरावतीत मध्ये कसे काय उमटले आहेत? त्यांच्या मागे एखादी शक्ती असल्याचे दानवे यांनी म्हंटले.