व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एका प्रामाणिक मराठी अधिकाऱ्याच्या विरोधात ही गरळ कोणासाठी?; अतुल भातखळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जाताहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच प्रश्नही उपस्थित केला आहे. “सामनाचा अग्रलेख वाचून याला बाबरनामा का म्हणू नये? असा प्रश्न मला पडलाय. ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका प्रामाणिक मराठी अधिकाऱ्यांच्या विरोधात ही गरळ कोणासाठी?, असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ठाकरे सरकार आणि सामनाच्या अग्रलेखावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणात करण्यात येत असलेल्या कारवाईवरून व त्याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून वानखेडे यांच्यावर सोडल्या जात असलेल्या निशाणावरून भातखळकर यांनी ट्विट करीत टीका केली आहे.

भटखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, सामनाचा अग्रलेख वाचून याला बाबरनामा का म्हणू नये असा प्रश्न मला पडलाय. ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका प्रामाणिक मराठी अधिकाऱ्यांच्या विरोधात ही गरळ कोणासाठी?

केंद्र सरकार ठाकरे सरकारच्या वाटमारीवर पांघरूण घालेले अशी अपेक्षा करू नका. केलेली वाटमारीही घशात हात घालून सरकारी तिजोरीत जमा केली जाईल. सामनातून कितीही ठणाणा केलात तरी.

गांजाच्या व्यवहारात नवाब मलिक यांचे जावई सापडेल हा दोष NCB आणि वानखेडेंचा कसा? तुम्ही पोलिसांना खंडण्या वसूल करायला लावलेत, केंद्रीय यंत्रणांनी ड्रग्ज माफियांवर कारवाई न करता तुमच्या सारखी वाटमारी करावी अशी शिवसेनेची अपेक्षा आहे काय?,असा सवाल भातखलकर यांनी केला आहे.