पवार, थोरात, ठाकरे म्हणजे “अमर, अकबर, अँथनी”, रावसाहेब दानवेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारच्या आघाडीबाबत सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपाचे खासदार तथा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन तोंडं आहेत, अशा शब्दात दानवेंनी निशाणा साधला आहे.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे. अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाहीये”, असेही दानवे यांनी म्हंटले आहे.

“महाराष्ट्रात भाजपासोबत काडीमोड घेऊन शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांचे सरकार स्थापन केले. पुन्हा एकदा राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल.आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाहीये” असेही मंत्री दानवे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment