हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी व्यक्त केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी आता थेट संभाजी राजेंवर निशाणा साधला. राजे मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका असे निलेश राणे यांनी म्हंटल.
‘संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही. https://t.co/BDcXXdl7QM
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 27, 2021
दरम्यान, शरद पवार आणि संभाजीराजे यांच्या भेटीत जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. यादरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली. तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मी विनंती केली असून मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, नारायण राणे यांना एकत्र आणलं पाहिजे असा आग्रह केला,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.