राणा दाम्पत्याला BMC ची नोटीस; अवैध बांधकामाचा ठपका

navneet and ravi rana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या मुंबईतील घरावर अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवण्यात आला असून याबाबत BMC ने त्यांना नोटीस बजावली आहे. 4 मे रोजी मुंबई महापालिकेचं पथक खार येथील राणांच्या निवासस्थानी आढावा घेणार आहे.

राणा दाम्पत्याचा मुंबई उपनगरातल्या खारमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेनं ठेवला आहे. BMC ने या घराला नोटीस लावली आहे. अवैध बांधकामाचा उल्लेख या नोटिशीत आहे. तसेच 4 मे रोजी BMC चे पथक राणा यांच्या या घराचा आढावा घेणार आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईला गेल होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगात आहे. अशातच पालिकेनं नोटीस बजावल्यानं राणा दाम्पत्याच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे