‘रेडी’मध्ये सलमान खानसोबत काम केलेल्या मोहित बघेल याचे कर्करोगाने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलमान खानसोबत ‘रेडी’ या चित्रपटात काम केलेला मोहित बघेल याचे आज शनिवारी निधन झाले. लेखक आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विटरवर मोहितच्या मृत्यूविषयी माहिती दिली आहे. मोहित बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होता. २६ वर्षांचा असलेला मोहित रेडीमध्ये छोटी अमर चौधरीच्या भूमिकेत दिसला होता.

राज शांडिल्य यांनी ट्वीट केले- “मोहित माझ्या भावा, इतक्या लवकर जाण्याची काय गरज होती? मी तुला सांगितले होते ना, पहा ही संपूर्ण इंडस्ट्री तुझ्यासाठी थांबली आहे, लवकर ठीक होऊन ये,तु खूप चांगली अ‍ॅकटिंग करतो, म्हणूनच पुढच्या चित्रपटाच्या सेटवर तुझी वाट पाहीन … आणि तुला यावंच लागेल. ॐ साई राम #cancer RIP.

मोहित रेडी व्यतिरिक्त, २०१९ मध्ये परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या जबरिया जोडी या चित्रपटात दिसला होता. छोटे मियां या कॉमेडी शोमधून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राजने मोहितला त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी साइन केले होते. मोहितने राजला आपला गुरू मानले होते आणि त्याच्याबरोबर कॉमेडी सर्कसमध्येही त्याने काम केले आहे.

 

मोहितचा जन्म १९९३ मध्ये मथुरा, उत्तर प्रदेशा येथे झाला होता. त्याच्या अभिनयावरील प्रेमामुळेच तो मुंबईला आला.

परिणीती चोप्रानेही मोहितच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.तिने ट्वीट केले,’ काम केलेल्या सर्वोत्कृष्ट लोकांपैकी तो एक होता. तो नेहमी आनंदी, सकारात्मक आणि प्रेरणादायक असायचा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.