ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या साठी ग्रामपंचायतीला शाळेच्या अखत्यारीतील पालकांशी चर्चा करून ठराव मंजूर करावा लागणार आहे.

शाळेत टप्या टप्याने बोलवण्यात येणार आहे. कोविड संबंधी नियमांचे पालन करणे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक असणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी बसवता येणार आहे. तसेच दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे लागणार आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी संख्या असणार आहे. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे याचे पालन करावे लागणार आहे.

या दरम्यान कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात येईल आणि त्याची लगेच कोरोना चाचणी करण्यात येईल. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी लागणार आहे किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.