मुंबई । महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गुरुवारी आणखी वाढ झाली. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं ३ हजारचा टप्पा ओलांडला आहे. सध्या राज्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची ३ हजार ८१ इतकी झाली आहे. मागील 24 तासांत राज्यभरात तब्बल १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १८७ रुग्णांचा मृत्यू झाला.
165 more #COVID19 cases (including 107 in Mumbai) reported in Maharashtra today, taking the total number of coronavirus cases in the state to 3081: State Health Department pic.twitter.com/a1xpyzfyrX
— ANI (@ANI) April 16, 2020
आज सापडलेल्या कोरोनाग्रस्त नव्या रुग्णांमध्ये एकट्या मुंबईतील १०७ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यात १९ रुग्ण वाढले आहेत. नागपूर महापालिकेच्या हद्दीत १० रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात एक जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबई व वसई-विरारमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९३२ वर, दिवसभरात २३२ नव्या रुग्णांची नोंद
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद
काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का
लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा