नवी दिल्ली | दिंडोरीच्या भाजप खासदार डॉ.भारती पवार एका भाषणातून कर्जमाफीच्या योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत होत्या. त्यावेळी त्यांच्या भाषणावर हसण्याचे दुष्कृत्य बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि रावेतच्या खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे. या दोघी शेतकरी कर्जमाफीवर हसत असल्याचे दिसल्याने त्यांची सोशल मीडियाने चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
भरती पवार यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी मोदी सरकार आणि फडणवीस सरकार कसे उभे आहे या संदर्भात भाष्य केले होते. विशेष म्हणजे भरती पवार या मराठीतून लोकसभेत भाषण करत होत्या. त्यावेळी त्यांच्यावर त्यांच्या पाठीमागे बसून भाजपच्याच खासदार हसत होत्या. शेकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर आपल्याच पक्षाच्या खासदार बोलत असताना या दोघी हसत असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान भाजपच्या या दोन असंवेदनशील खासदारांच्या विरोधात सोशल मीडियाने चांगलाच मोर्चा उघडला आहे. यांचे बाप शेतकरी नसल्याने यांना शेतकऱ्यांचे काहीच सुख दुःख आणि अशा आशयाचे मॅसेज हा व्हिडीओ सोबत व्हायरल होत आहेत. त्यामुळे हा मुद्दा विरोधाकडून देखील उचलून धरला जाण्याची शक्यता आहे.
पहा तो व्हायरल व्हिडीओ
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट