नवी मुंबई प्रतिनधी | गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र भाजपचा आज महाप्रवशे सोहळा संपन्न झाला. त्यात गणेश नाईक यांचा प्रवेश झाला नाही. त्यांचा प्रवेश का झाला नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भाजप गणेश नाईक यांच्यावर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देणार आहे. त्यामुळे त्यांना मानणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अन्य नेत्यांची भाजपमध्ये सामील करून घेण्याची जुळणी करण्यासाठी गणेश नाईक भाजप प्रवेशासाठी थांबले आहेत.
गणेश नाईक यांना मानणारा मोठा वर्ग ठाणे जिल्ह्यात पसरलेला आहे. त्यामुळे ते ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या आपल्या मर्जीतील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन जाणार आहेत असे वृत्त समोर आले आहे. बोरिवली, ठाणे, मीरा भाईंदर या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या नेत्यांची जुळणी करून गणेश नाईक आपल्या ५७ नगरसेवकांसहीत भाजप प्रवेशाचा मोठा सोहळा घडवून आणणार आहेत.
गणेश नाईक यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्काच बसला. गणेश नाईक यांनी त्यांच्या नेतृत्वात निवडून आलेले राष्ट्रवादीचे ५७ नगरसेवक देखील भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या हाती असणारी एकमेव महानगरपालिका गमवावी लागली आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला दिलेला धक्का मोठा आहे.
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
म्हणून केला नाही गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश
भाजपचा महाप्रवेश सोहळा संपन्न ; शिवेंद्रराजेंसह इतर आमदारांचा भाजप प्रवेश
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी