फलटण प्रतिनिधी | भोसले आणि निंबाळकर घराण्याचा वाद हा ऐतिहासिक वाद म्हणून गणला जातो. याला साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे निंबाळकर आफवाद ठरू शकणार नाहीत. कारण मागील दोन दिवसापासून रंगलेला दोघांमधील वाद आता शिगेला गेला आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी रामराजेंचा पुतळा जाळल्याने रामराजेंच्या समर्थकांनी फलटण बंद पाळला आहे.
विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळणार कॅबेनेट मंत्रिपद!
पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात फलटण शहरातून मोटार सायकलची रॅली काढून शहरवासियांना बंदचे आव्हान करण्यात आले. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून हि रॅली संपन्न करण्यात आली. यावेळी रामराजे निंबाळकर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. तर उदयनराजेंचा निषेद व्यक्त करण्यात आला.
रामराजेंची जीभ हासडून हातात दिली असती : उदयनराजे भोसले
दरम्यान रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्या मधील वाद मिटवण्यासाठी शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या बैठकीत पुढाकार घेतला. मात्र तोडगा निघू शकला नाही. या प्रसंगी भडकलेल्या उदयनराजेंनी बैठक अर्ध्यावर टाकूनच तेथून निघून जाणे पसंत केले. याच वेळी उदयनराजेंनी माध्यमात आपली भूमिका मांडली. रामराजे माझ्या वयाचे असते तर त्यांची जीभ हासडून त्यांच्या हातात दिली असती असे गंभीर विधान उदयनराजेंनी केले आहे.