Breaking | सौरव गांगुलीच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला करोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. स्नेहाशीष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गांगुलीने कुटुंबासह स्वत:ला होम क्वारंटाइन केले होते.

गांगुली आणि त्याचा मोठा भाऊ एकाच घरात राहत असल्यामुळे गांगुलीने क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. गांगुलीच्या भावाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली होती.त्यानंतर गांगुलीने स्वत:ची देखील करोना चाचणी केली होती. आता त्याच्या चाचणीचा रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह असल्याने सर्वांना मोठा दिसाला मिळाला आहे.

गांगुलीच्या या रिपोर्टमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. गांगुलीला करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तरी त्याने धोका न पत्करता करोना चाचणी केली होती. त्याचा मोठा भाऊ स्नेहाशीष सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर गांगुली घरातूनच बीसीसीआयचा सर्व कारभार करत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment