हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी, अध्याप 1200मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता, रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे. त्यामुळे लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. आम्ही कुठे कमी पडतो आहे का ? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही जगानेही तो स्वीकारला आहे. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, कळत नकळत प्रसार हा फार घातक आहे. तरुण वर्ग जास्त बाधित होत आहे हे आढळून येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
BREKING NEWS : मुख्यमंत्र्यानी दिला आठ दिवसाच्या लॉकडाऊनचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. यात महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथे ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे.
राज्यासाठी जो निर्णय असेल, तो पुण्यासाठी नको, अजित पवारांची भूमिका
बैठकीपूर्वी सुरवातीला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी माहिती दिली.त्यानंतर ठाकरे म्हणाले, लोकांचे येणे जाणे कमी करणे हा विषय आहे. कार्यालयाच्या वेळा बदला. घरी काम करण्याची परवानगी द्या पण अजून ते झालेलं नाही. व्हॅक्सिनचा दुसरा डोस देऊन पण लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधानसमोर मांडला होता. चेन तोडणे आरोग्य सुविधा वाढवणे गरजेचे आहे. कालच निर्णय झाला असता पण काल देवेंद्र फडणवीस नव्हते म्हणून आजचीही बैठक बोलावली आहे. एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे. महिन्याभराच्या आता आपण नियंत्रण आणू शकतो. पण एकमत व्हायला हवं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोनाचे रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील ही उपाययोजना हवी. खाजगी स्तरावर रेमडेसीवर कुठेही नाही ही गंभीर बाब आहे. लसीचा पुरवठा होईल याची व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. राज्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागेल. इतर ठिकाणाहून कसं ऑक्सिजन मिळालं पाहिजे, इंडस्ट्रीचं ऑक्सिजन कमी करावा लागेल. बेड्स मॅनेज करावे लागतील. हा प्रादुर्भाव किती दिवस राहील हे सांगता येत नाही त्यामुळे व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. आम्ही लोकांना समजवू, सत्ताधारी मंत्रींना सांगा, रोज केंद्राकडे बोट दाखवत असतील तर मग आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा कसे करता. सत्ताधारी मंत्र्यांना समज देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री जनभावनेचा विचार करा, आमची सर्व प्रकारे सहकार्य करण्याची तयारी आहे. लॉक डाऊनबाबत छोटे उद्योगामध्ये नाराजी आहे. त्यांना काही तरी पर्याय द्यावा लागेल. त्यांना जीएसटी, वीज बिल भरावा लागतो. छोटा व्यवसायिक जर आता संपला तर तो पुन्हा उभा राहू शकणार नाही. राज्य सरकारने आर्थिक बाबीचा विचार न करता काही ना काही मदत केली पाहिजे.
अशोक चव्हाण म्हणाले, आव्हानात्मक परिस्थिती आपल्याकडे आहे. लॉकडाऊन किंवा निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचंही नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू साध्य करायला हवा.
थोरात म्हणाले, कटू निर्णयाची अमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल. मृत्यू थांबणं यासाठी सर्वोत्तम उपाय करा. कटू निर्णय घ्यावा लागला तरी तो स्वीकारावा लागेल. कटू निर्णयाची अमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल. गुजरातमधून रेमडेसीवरचा साठा मिळू शकला तर पाहावे.
राजेश टोपे म्हणाले, 50 हजार रेमडीसीविरची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या दिवसात 1 लाखाहून ही जास्त लागतील. प्रत्येक खासगी रुग्णालयात रेमडीसीविर कुणाला देतायत याची तपासणी केली जाणार आहे. रेमडीसीविर देणाऱ्या रुग्णांची वर्गवारी केली पाहिजे. कोविड खासगी रुग्णालयात जिल्हाधिकारींनी नियंत्रण ठेवावं जेणेकरुन रेमडेसीवरच्या उपयोगावर नियंत्रण येईल रेमडेसीविरचा एक्स्पोर्ट थांबवला पाहिजे. ट्रेसिंग करणे खूप अवघड आहे मुंबई , पुणे सारख्या शहरात ट्रेसिंग करणे कठीण आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढतोय. विविध शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी कठोर निर्बंध लावूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कोरोना आळा घालण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली होत आहेत. त्यांच्यासाठी राज्य सरकारने काही ठोस भूमिका घ्यावी.
नाना पटोले म्हणाले, आजची जी स्थिती आहे लोकांचा जीव वाचवण्याला आपली प्राथमिक जबाबदारी राहिली पाहिजे. त्यावर टोपे म्हणाले, व्हॅकसीन 6 लाख एक दिवसाला आणि 40 लाख एका आठवड्यात हवे आहे आणि महिन्याला एक कोटी लागणार आहे. या विषयात कुणालाही राजकारण करायचं नाहीये. 25 वर्षापासून आपण ओळखतो. मी काय फार मोठा माणूस नाही. संक्रमण वेगाने पसरतंय. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा मदत करावी. व्हॅक्सिन मिळावं, आयसीयू, आणि व्हेंटिलेटर मुंबई आणि पुणे येथे वाढवण्याची गरज आहे. ऑक्सिजनची कमतरता भारत सरकारला सांगून दूर करावी.
प्रवीण दरेकर म्हणाले, लोकांना मानसिक दिलासा द्यावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे. रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील ही उपाययोजना करायला हवी. खासगी स्तरावर रेमडेसिवर कुठेही नाही ही गंभीर बाब आहे. रेमडेसिवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागेल, इतर ठिकाणांहून कसं ऑक्सिजन मिळालं पाहिजे, इंडस्ट्रीचं ऑक्सिजन कमी करावं लागेल, बेड्स मॅनेज करावे लागतील.
प्रवीण दरेकर म्हणाले, काँग्रेसमध्ये एकमत नाहीत. नाना पटोले यांचे मुंबईत होर्डिंगज लावले जात आहेत. त्यामध्ये लॉकडाऊन चालणार नाही, असं म्हटलं जातंय. इथेच बाळासाहेब थोरात म्हणत आहेत, कडक आणि कटू निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकमत नाही. उद्योग, व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करा.मानसिक दिलासा एकमेकांना देण्याची गरज आहे. समन्वय आवश्यक. एकमेकांची उणी दुणी निघत असतात. पण आपण एकमेकांच्या विचाराने पुढे जाऊ.