हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : सरकारकडून जनतेसाठी स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जाते आहे. वास्तविक, आर्थिक वर्ष 2022-23 साठी Sovereign Gold Bond (SGB) योजनेची दुसरी सिरीज आजपासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 5,197 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, ही योजना फक्त पाच दिवसांसाठीच (22 ते 26 ऑगस्ट 2022) खुली असेल. या काळात गुंतवणूकदारांना बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल.
Sovereign Gold Bond म्हणजे काय???
सरकार कडून Sovereign Gold Bond मधील गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने देत नाही तर सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याची संधी दिली जाते. यामध्ये किणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात एक ग्रॅम ते चार किलोपर्यंत सोन्याची खरेदी करता येते. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात हा पहिला इश्यू उघडला गेला आहे.
ऑनलाइन खरेदीवर मिळेल 50 रुपये प्रति ग्रॅम सूट
डिजीटल माध्यमातून Sovereign Gold Bond साठी अर्ज करणार्या आणि पेमेंट करणार्या गुंतवणूकदारांसाठी इश्यूची प्राईस 50 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 5,047 रुपये प्रति ग्रॅमने कमी होईल. यामध्ये गुंतवणूकदारांना निश्चित किंमतीवर सहामाही आधारावर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल, असे RBIकडून सांगण्यात आले आहे.
Sovereign Gold Bond कुठे खरेदी करता येईल ???
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे गोल्ड बॉण्ड्स सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे विकले जातील. इथे हे ध्यानात घ्या की, हे गोल्ड बॉण्ड्स स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेमध्ये विकले जात नाहीत.
जास्तीत जास्त 4 किलो पर्यंत बॉण्डच्या खरेदीची मर्यादा
Sovereign Gold Bond योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील. यामध्ये किमान एक ग्रॅमसाठी गुंतवणूक करता येईल. त्याच वेळी, ट्रस्ट किंवा तत्सम संस्थाना 20 किलोपर्यंतचे बॉण्ड्स खरेदी करता येतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/gold-banking/sovereign-gold-bond-scheme-sgb
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर पहा
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!
Share Market : गेल्या आठवड्यात टॉप 10 पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!
Multibagger Stock : गेल्या वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 63,000% रिटर्न !!!