“पक्षाच्या नेत्यांना बोलला तर खपवून घेणार नाही”; चंद्रकांतदादांचे राऊतांना सडेतोड उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. “राऊतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करून खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे आहे का? आणि स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? तुम्ही भाजपच्या नेत्यांवर आरोप केल्यावर मी शांत बसायचं हे कसं होईल? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक आहेत, हे सगळे भांबावून गेले आहेत. पक्षाच्या नेत्यांना बोललेले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझा आणि राऊत किंवा पवार यांच्या बांधला बांध नाही. राऊतांना शेतीतील कळत नाही. त्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नाही. पण किरीट सोमय्या हे माझे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे माझे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्यावर आरोप केल्यावर मी बोलायचे नाही? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अमोल काळे यांच्याबाबतही मत मांडले. ते म्हणाले कि, कोण अमोल काळे? त्यांच्यावर काय आरोप आहेत हे मला माहीत नाही. 27 महिने यांचे सरकार आहे. इतके वर्षे काय झोपा काढत होता काय? सरकारकडे तक्रार करावी. 27 महिने या गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.