नाना पटोलेंच वक्तव्य भ्रमिष्टासारखं; मोदींवरील टीका सहन करणार नाही; चंद्रकांतदादांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची व्हिडोओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. “आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे विधान पटोले यांनी भंडारा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केले आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंवर टीका केली आहे. “आपण काय बोलतोय. याचा त्यांना पत्ता नसतो. पंतप्रधान मोदींबद्दल काहीही बोललेले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही,” असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंच्या वक्तव्यानंतर माध्यमांशी संवाद साधत संताप व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींबद्दल काहीही बोललेले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही. नेता तसा कार्यकर्ता म्हणावा लागेल. त्याचे राष्ट्रीय नेते सुद्धा असेच मध्ये गायब होतात. पटोले याचे वर्तन हे आता भ्रमिष्टासारखे चाललेले आहे. पंजाबच्या घटनेनंतर ते नौटंकी असे म्हंटले. आता यापुढे भाजप अशा प्रकारची वक्तव्ये सहन करणार नाही.

मंत्री नारायण राणे यांनी जेव्हा जर तरची वक्तव्ये केली होती. नितेश राणे यांच्याबाबत एक विधान केले तेव्हा त्याच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावली. आता बघूया पोलिसांकडून काय कारवाई केली जातेय ती. जे पटोलेंवर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेणारे आहोत, असा इशार यावेळी पाटील यांनी दिला.

व्हिडीओमध्ये पटोले नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी व्हिडीओमध्ये केले आहे.

Leave a Comment