एमआयएम महाविकास आघाडीच्या युतीच्या चर्चेबाबत चंद्रकांतदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याबाबत जलील यांनी विधान केले. वास्तविक त्यांच्यात युती झाली तरी आणि ते एकत्रित आले तरी त्याचा भाजपवर काहीच फरक पडत नाही. आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत,” असे पाटील यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आमची एवढी भीती निर्माण झालीय की सर्वजण एकमेकांचा हात घट्टपणे धरण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण असेल आणि धनगर आरक्षण असेल या महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही. धनगरमधील ध चा सुद्धा या सरकारने अडीच वर्षात उच्चार केला नाही.”

भाजपचा कारभार पारदर्शक असतो. चुकीच्या गोष्टींवर आम्ही अंकूश ठेवतो. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सोडून कोणीही आले तरी चालते असे त्यांना वाटते. पण आम्ही आमच्या सहयोगींसोबत त्यांच्याशी लढत देणार आहोत. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीतील जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते करायचे ठरवले आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment