Thursday, October 6, 2022

Buy now

“उचलली जीभ लावली टाळ्याला…”; पंतप्रधानांवरील टिकेवरून चंद्रकांतदादांचा राऊतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या  कारवायांवरून काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हललाबोल केला. “एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असे राऊत यांनी म्हंटले. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक असे ट्विट करीत राउतांवर टीका केली आहे. “उचलली जीभ लावली टाळ्याला… मागचा-पुढचा काहीही विचार न करता बोलणं. विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचं सध्या तसंच चाललंय, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, उचलली जीभ लावली टाळ्याला… मागचा-पुढचा काहीही विचार न करता बोलणं. विश्वप्रवक्ते राऊत यांचं सध्या तसंच चाललंय. आता काय तर म्हणे दिल्लीतही पुतीन आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रावर मिसाइल हल्ले होतात. भारत आपला देश आहे आणि महाराष्ट्र अजूनही देशातच आहे, सांगा रे त्यांना कुणी !”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राऊतांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजप नेतेही चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडूनही राऊतांवर निशाणा साधला जात आहे.

काय केली पंतप्रधानांवर राऊतांनी टीका –

काल नागपुरात एका कार्यक्रम प्रसंगी राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाना साधला. “रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची चर्चा जगभर सुरू आहे. आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असा टोला लगावतानाच सध्या देशाचं वातावरण बदलून गेले आहे, असे राऊत यांनी म्हंटले.