हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काल मतदान पार पडले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसचे नेते था अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे याची. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला. मात्र, तांबेच्या पाठींब्याबाबत काल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक विधान केल्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुली ऑफरचं दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबाचा निर्णय घ्यावा. त्यांनी जो निर्णय घेतला त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभाजित होणार नाही. हे ठरलेले आहे. तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु.
बावनकुळे यांनी सत्यजित तांबे यांच्याबद्दल सूचक असे विधान करत एक प्रकारे तांबे विजयी झाल्यास त्यांना भाजप प्रवेश देण्याबाबत अप्रत्यक्षपणे मत व्यक्त केले आहे. आता भाजपच्या ऑफरबाबत सत्यजित तांबे नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.