हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Internet : इंटरनेट हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. जवळपास सर्वच कामांसाठी इंटरनेट वापरले जाते. त्यामुळे अनेक कंपन्या देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्लॅन्स सादर करत राहतात. भारतातील अनेक सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडून ऑफर केला जाणारा सर्वात लोकप्रिय ब्रॉड बँड प्लॅन म्हणजे 100 Mbps प्लॅन. या प्लॅनद्वारे हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी तर मिळतेच मात्र त्याबरोबरच त्याची किंतीतही कमी असेल. ऑनलाइन अभ्यासासाठी म्हणा किंवा वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा गेमिंग किंवा एन्टरटेनमेन्ट म्हणा, या प्लॅनद्वारे आपल्या सर्व गरजा पूर्ण होतात. येथे आम्ही काही कंपन्यांकडून ऑफर केल्या जाणाऱ्या 100 Mbps प्लॅनची लिस्ट देत आहोत. Internet
1. JioFiber चा 100 Mbps प्लॅन
भारतातील सर्वात विश्वासार्ह सर्व्हिस प्रोव्हायडर्सपैकी एक असलेला JioFiber 699 रुपयांमध्ये 100 Mbps इंटरनेट स्पीड डेटा प्लॅन ऑफर देतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. तसेच या प्लॅनची FUP लिमिट 3300GB किंवा 3.3TB आहे. त्याचबरोबर या प्लॅनसह युझर्सना 100 Mbps चा सिमेट्रिकल अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल.
2. Airtel स्टॅण्डर्ड पॅक
Airtel एक्सस्ट्रीम फायबर द्वारे 1 Gbps पर्यंत हाय-स्पीड इंटरनेट मिळू शकेल. यामध्ये युझर्सना टॅक्स वगळता 799 रुपयांच्या मासिक किंमतीत 100 Mbps इंटरनेट स्पीड देणारा ‘स्टँडर्ड’ पॅक मिळू शकेल. तसेच युझर्सना या प्लॅनसह 3.3TB किंवा 3300GB मंथली फेअर-यूझ-पॉलिसी (FUP) डेटा देखील मिळेल.
3. Excitel चा 100 Mbps प्लॅन
भारतातील वाढत्या ब्रँडपैकी एक असलेला Excitel चा 100 Mbps प्लॅन युझर्सच्या सोयीसाठी वेगवेगळ्या किंमती टॅग आणि कालावधींमध्ये येतो. Excital’s Fiber First युझर्सना 699 रुपयांमध्ये एका महिन्यासाठी 100 Mbps प्लॅन ऑफर करते. यामध्ये युझर्सना अनुक्रमे 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिन्यांचे प्लॅन अनुक्रमे रु. 565, रु 508, रु 490, रु. 424 आणि रु. 399 मध्ये मिळू शकतात. मात्र, 9 महिन्यांचा प्लॅन हा फक्त नवीन ग्राहकांनाच मिळेल. तसेच, एक्सेल प्लॅन पूर्णतः अनलिमिटेड आहेत आणि यावर कोणतेही FUP डेटा लिमिट लागू केलेली नाही.
4.BSNL चा 100 Mbps प्लॅन
भारत फायबर ब्रॉडबँड अंतर्गत, सरकारी मालकीची टेल्को BSNL आपल्या युझर्सना एक आकर्षक प्लॅन ऑफर करत आहे. BSNL दोन 100 Mbps प्लॅन ऑफर करते. यातील पहिला म्हणजे सुपरस्टार प्रीमियम-1 आणि दुसरा म्हणजे फायबर व्हॅल्यू प्लॅन. सुपरस्टार प्रीमियम-1 आणि फायबर व्हॅल्यू प्लॅन हे अनुक्रमे 749 रुपये आणि 799 रुपये प्रति महिना 100 Mbps इंटरनेट स्पीड देतात. सुपरस्टार प्रीमियम-1 प्लॅनमध्ये 1000GB FUP डेटा लिमिट आहे तर फायबर व्हॅल्यू प्लॅनमध्ये ती 3300GB आहे. या पॅकच्या किंमतीमध्ये GST चा देखील समावेश असेल. तसेच यामध्ये ग्राहकांना वार्षिक 100 Mbps चा पॅक 9,588 रुपयांमध्ये मिळू शकेल.
5. ACT चा 100 Mbps प्लॅन
बंगलोर मधील इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर रॅपिड प्लस नावाने 100 Mbps 100 Mbps अनलिमिटेड डेटा प्लॅन ऑफर करते. युझर्सना हा प्लॅन 985 रुपये मासिक खर्चाने मिळेल. या पॅकची FUP डेटा लिमिट 1000GB आहे, त्यानंतर इंटरनेट स्पीड 512 Kbps वर येईल. युझर्स या पॅकसह काही OTT प्लॅटफॉर्म आणि विविध Add On देखील फ्री मध्ये मिळवू शकतात. मात्र इथे हे लक्षात घ्यावे की, हा प्लॅन फक्त बेंगळुरू शहरासाठीच असेल आणि देशभरात वेगळा असू शकेल.
हे पण वाचा –
Jio Recharge : फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी; एकदा केला की 1 वर्ष पहायची गरज नाही
Bank Holiday : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा
PM Kisan Mandhan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या तपशील
Business Idea: कमी खर्चात ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे; कमी खर्चात जास्त नफा