“नवाब मलिक आणि दाऊद कनेक्शन थोतांड”; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. मलिक याच्या मनी लॉंड्री प्रकरणाचा दाऊदशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद प्रतिक्रिया दिली. “मलिक आणि दाऊद याचे कनेक्शन असल्याचे खोटे बोलले जात आहे. वास्तविक यांचा काही संबंधच नाही. मलिक प्रकरणात आम्ही कायदेशीर लढाई लढणार,” असे भुजबळ यांनी म्हंटले.

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना काल ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्यावरील आरोप अजूनही सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे मलिक याचा दाऊदशी संबंध जोडून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. वास्तविक माहिती घेतल्यास मलिक यांच्यावर जे आरोप केले जात आहेत. त्यामागील सत्य हे आहे की, मुनिरा हिची जमीन आहे. त्यावर अतिक्रमण आहे.

नवाब मलिक यांचं छोट्या जागेत गोडाऊन आहे. सलीम पटेल हा स्थानिक रहिवासी आहे. या प्रकरणात दाऊद अँगल येत नाही. स्थानिक पातळीवरील हे प्रकरण आहे. दाऊदचं नाव जोडून विधानसभा सदस्य निवडून आले आहेत ते दहशतवाद्यांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. केवळ मुस्लीम आहे म्हणून दाऊदचा संबंध लावताय का? हे सर्व प्रकरण कोर्टात आहे. जामीन मिळेपर्यंत कायदेशीर लढाया लढाव्या लागतात, असे भुजबळ यांनी म्हंटले.

Leave a Comment