नवी दिल्ली | आयएनएक्स(INX) मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे. या कोठडीत त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्याचा सीबीआयचे अधिकारी प्रयत्न करणार आहेत. मात्र पी. चिदंबरम यांची संपत्ती एवढी आहे की त्यांच्या संपत्तीचे विवरण वाचूनच तुमचे डोळे फिरतील.
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी पी. चिदंबरम यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. त्याच्याकडे जवळपास १७५ कोटी रुपयांची संपत्ती आहे असे असे त्यांनी सदर प्रतिज्ञा पत्रात म्हणले आहे. तसेच त्याच्या संपत्तीचे आणि कोटींच्या एफडीचे वार्षिक उत्पन्न ८. ५ कोटी एवढे आहे. येथे सामान्य माणसाला १ कोटी कमवायला संपूर्ण हयात निघून जाते. या मंडळी कडे एवढे पैसे येतात कुठून असा सवाल आता चिदंबरम यांच्या अटकेच्या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.
१० लाख रुपयांच्या विमा पॉलिसी , २७ लाख रुपयांची वाहने, ८५ लाख रुपयांचे दागिने असा त्यांच्या संपत्तीचा एक भाग आहे. तसेच त्यांच्या बँकेतील ठेवी देखील कोटींमध्येच आहे. त्यांची बँकेतील सर्वात मोठी ठेव हि २० कोटी रुपयांची आहे. तर सर्वात लहान ठेव हि ३ लाख रुपयांची आहे. युके केंब्रिज मध्ये १.७ कोटींची संपत्ती, तर ४५ लाख रुपयांच्या व्यवसायिक इमारती आहेत. तर देशात आणि विदेशात असणाऱ्या त्यांच्या बंगल्याचे मूल्य ३२ कोटी रुपये एवढे आहे.