हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईत विधानभवनात “माझा अर्थसंकल्प- माझ्या मतदार संघासंदर्भात’ कार्यशाळा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. “किती पातळीपर्यंत हमारी तुमरी करायची. सत्ताधारी पक्ष म्हणून आज एक आहे उद्या दुसरे असतील. हि परंपरा चालूच राहणार आहे. पण एखादे मत व्यक्त केल्यानांतर आपल्याकडून सूचनांची अपेक्षा असते. पण शाडू ठोकणे हा काय कुस्तीचा आखाडा नाहीय, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला.
मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यशाळेत मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजप व विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. यावेळी ठाकरे म्हणाले की, ” आपण राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. प्रेकवेळी अर्थसंकल्पाच्या चर्चेवेळी शेरो शायरी करायची टीका टिप्पण्णी करायची हे आता बंद केले पाहिजे. राज्यात सरकार चालवताना एका, आरोप हे होतच राहतात. मात्र, ते करीत असताना एका ठराविक पातळीपर्यंत करायची असते. टीका करण्याबरोबरच सूचनाही मिळणे महत्वाचे असते. एखाद्या विषयावरून सभेत गोंधळ घालायचा, आरडाओरडा करायची हे योग्य नाही. मात्र, तसे करण्याऐवजी सभापतींपुढे जाऊन गोंधळ घातला जातोय, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला.
"राज्याचा अर्थसंकल्प – माझ्या मतदार संघाच्या संदर्भात" कार्यशाळा उद्घाटन – LIVE https://t.co/DSeDYEHZ4a
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 5, 2021
राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आज घेतलेल्या कार्यशाळेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी आहे. ठिपके माझ्या महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत. ते मतदारसंघ एकत्र जोडले गेले आणि त्याच्यामध्ये आपण रंग भरले. तर त्या रांगोळीला अर्थ येतो. रांगोळीतील ठिपके जोडण्याचं काम निवडून आलेल्या आमदारांनी करायचे आहे. कारण ठिपका जोडला गेला तर माझे राज्य जोडले जाणार आहे.