मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्थितीने झालेल्या विध्वसांतून नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यातील जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला दाद देत समाजसेवी संस्था, उद्योगपती, नेते आणि बँका यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरभरून मदत केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ दिवसात २० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या वतीने ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
उद्योगपती, नोकरदार , लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपल्या इच्छेने काही रक्कम मदत म्हणून दिली. त्या मदतीचा वापर आता पूरग्रस्तांना घरे बांधून देण्यात केला जाणार आहे. तसेच इतर पायाभूत सुविधा देखील दिल्या जाणार आहेत.
दरम्यान राज्यावर संकट आल्यावर लोक आपल्या बांधवांच्या पाठीशी कसे उभा राहतात याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रात बघायला मिळाले आहे. कोल्हापूर आणि सांगली या पूरग्रस्त भागात पुनर्वसन करण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अंदाज राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आला आहे. त्याच प्रमाणे केंद्र सरकारकडे ६ हजार १८३ कोटी रुपयांची मागणी देखील करण्यात आली आहे. या मदतीच्या पैशातून पूरग्रस्त लोकांना घरे बांधून देण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी इतर सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत. तसेच पूर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी उपाय योजना देखील केल्या जाणार आहेत.
राष्ट्रवादीचा लोकसभा उमेदवार झालेल्या त्या शिवसेना नेत्याची उद्या घर वापसी
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने
विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या