हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या राष्ट्रीय माध्यमांनी ऑस्ट्रेलियाला धमकी दिली आहे की,’ जर त्यांनी अमेरिकेला व्यापार युद्धात साथ दिली तर त्यांच्यासाठी ते खूप वेदनादायक ठरेल. ऑस्ट्रेलियाने अमेरिकेला पाठिंबा दिल्यास त्यांना बरेच नुकसान सोसावे लागेल, अशी धमकीवजा समज चीनने दिला आहे.
अमेरिकेने शुक्रवारी जाहीर केले की,’ ते ३३ चिनी कंपन्यांवर बंदी घालणार आहे. यानंतर चिनी राष्ट्रीय माध्यमांनी या निर्णयाला दोन देशांदरम्यानच्या शीत युद्धाची सुरुवात असे म्हटले आहे.
ग्लोबल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात असे म्हटले गेले आहे की,’ ऑस्ट्रेलियाने भारताप्रमाणेच गप्प रहावे आणि दोन्ही देशांचे नुकसान होऊ नये म्हणून या संपूर्ण वादापासून दूर राहिले पाहिजे . अमेरिकेपेक्षा चीनच्या धमक्यांमुळे ऑस्ट्रेलियाला अधिक नुकसान होईल. तसेच चीन अमेरिकेपेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक कडक शिक्षा देऊ शकतो, असेही या लेखात म्हटले आहे. कारण ते ऑस्ट्रेलियावर आर्थिकदृष्ट्या कमीच अवलंबून आहेत.
अमेरिका चीनच्या निर्यातीसाठी अव्वल क्रमांकाची बाजारपेठ आहे तर ऑस्ट्रेलिया यासाठी १४ व्या क्रमांकावर आहे. या लेखात असेही म्हटले आहे की,’ चीन आणि अमेरिका यांच्यात चालू असलेल्या कोल्डवारमध्ये वॉशिंग्टनला पाठिंबा दिला तर ऑस्ट्रेलियाला धडा शिकविण्यास चीन अधिक आनंद होईल. याचा सहज अर्थ असा आहे की ऑस्ट्रेलियाला अमेरिकेपेक्षा जास्त त्रास होईल.
कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी ऑस्ट्रेलियाने चीनला दोष दिला. आपल्या संपादकीय लेखात त्यांनी असे म्हटले आहे की,’ ट्रम्प प्रशासन कोरोना विषाणूचा सामना करण्यास अपयशी ठरत आहे आणि लोकांचे लक्ष त्यापासून दूर करण्यासाठी ते चीनला दोष देतात. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा हा जवळपास १ लाखांवर पोहोचला आहे. या राजकीय षडयंत्रात अडकण्यासाठी इतर देशांना, विशेषत: ऑस्ट्रेलियाला गरज नाही, असेही या लेखात म्हटले आहे.
गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या आंतरराष्ट्रीय तपासणीच्या अमेरिकेच्या दाव्याचे समर्थन केले आणि त्यासाठी चीनला दोषी ठरवले. त्यानंतर चीनने ऑस्ट्रेलियावर हल्ले करण्यास सुरवात केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.