आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘त्या’ घटनेचा संदर्भ लावणं चुकीचं – चित्रा वाघ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज एस. टी. कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागून पवार याच्या सिल्वर ओक या निवासस्थानी मोर्चेकरींनी दगडफेक केली. राज्यात अनेक नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेव यांच्या निवासस्थानावर निघालेल्या मोर्चाचा संबंध आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी लावणं चुकीचं आहे असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनात १२५ कर्मचार्यांनी आपले जीव गमावले आहेत. मागील काही महिने हे कर्मचारी आझाद मैदानावर आपले आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात एस.टी. च्या विलगीकरणाचा मुद्दा लिहिला होता. त्यामुळेच ST कर्मचार्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन आज कर्मचार्‍यांनी पवार साहेबांचे घर गाठले असे वाघ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून मात्र हा मोर्चा भाजप व देवेंद्रजींनी घडवून आणल्याचा चुकीचा कांगावा केला जातोय. भाजपचं देवेंद्रजींचं नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकारण होत नाही का हा प्रश्न यामुळे पडतो आहे असं वाघ यांनी म्हटले आहे.