औरंगाबाद | मनपा आरोग्य विभाग व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकायार्ने शहरात सहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून 61 व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एसएसएस शाळेत 119 पैकी 12 पॉझिटिव्ह, पैठण गेट 125 मधून आठ पॉझिटिव्ह, महावीर भवनात 77 पैकी 9 पॉझिटिव, शहागंज मध्ये 143 पैकी 13, अग्रसेन भवनात 150 पैकी 13 आणि पाटीदार भवन येथे 102 पैकी 6 असे एकूण 116 पैकी 61 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
सरकारी कार्यालयात 21 पॉझिटिव्ह :
शहरातील प्रमुख पाच सरकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची अँटीजन चाचणी घेण्यात आली आहे. मनपा मुख्यालयात पंधरा जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली. यात आठ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात 20 जणांच्या चाचणीतून 7 पॉझिटिव्ह जिल्हाधिकारी कार्यालयात 50 पैकी एकही नाही. विभागीय आयुक्त कार्यालयात येथे 68 पैकी 6 पॉझिटिव, आरटीओ कार्यालयात येथे 54 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली यात कोणीही पॉझिटिव आढळून आले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.