हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 एप्रिल रोजी सीकेपी बँकेचा परवाना रद्द केला होता, त्यानंतर या बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. आरबीआयच्या या निर्णयानंतर सर्व ग्राहकांचे पैसे हे या बँकेत अडकले होते. परंतु आता सुमारे दोन महिन्यांनंतर या ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा एफडीचा रिफंड डिपॉझिट विमा कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) कडून मिळणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये सरकारने डिपॉझिट विम्याची रक्कम ही 1 लाख रुपयांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. आता सरकारच्या या घोषणेचा फायदा सीकेपी बँकेच्या ग्राहकांना झाल्याचे दिसून येत आहे.
या डिपॉझिट विमाबाबत वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणेनुसार एफडी वरील व्याज किंवा पाच लाख रुपयांची रक्कम यांपैकी जे कमी असेल ते ग्राहकांना दिले जाईल. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स महासंघाने ही माहिती दिली आहे.
या कागदपत्रांसह एक फॉर्म भरावा लागेल
वैयक्तिक ग्राहक किंवा संयुक्त ग्राहक ज्यांनी या सीकेपी बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक केलेली आहे आता त्यांचे पैसे मिळविण्यासाठी डिपॉझिट कॉर्पोरेशनच्या नियमांनुसार त्यांच्या पैशाचा दावा करु शकतात. यासाठी त्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पैशाच्या पावतीसाठी त्यांना बँकेच्या विहित नमुन्यात पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि आवश्यक ती कागदपत्रे यासारख्या पुरावे द्यावे लागतील.
बँकेने पोस्ट करून ग्राहकांना फॉर्म पाठवले आहेत
विहित फॉर्म हे सीकेपी बँकेने पोस्ट करून आपल्या ग्राहकांना पाठवले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ज्यांना हा फॉर्म मिळालेला नाही ते आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन घेऊ शकतात. याशिवाय बँकेच्या www.ckpbank.net या वेबसाईट वरही फॉर्म उपलब्ध आहेत. महाराष्ट्र नगरी सहकारी बँक महासंघाने प्रेस नोटद्वारे ही माहिती दिली आहे.
1.25 लाख खातेदारांचे पैसे अडकले आहेत
विशेष म्हणजे 2014 पासून सीकेपी बँकेवरील बंदीचा कालावधी हा सतत वाढत होता. या बँकेच्या निव्वळ किमतीत सातत्याने घसरण होत असल्याचे आरबीआयने म्हटले होते. संच या बँकेचा चालू नफा असूनही नेट वर्थ कमी होत होता. यानंतर अखेर आरबीआयने या बँकेचा परवानाच रद्द केला आहे. आरबीआयच्या या निर्णया नंतर जवळपास दीडशे खातेदारांवर संकट उभे राहिले होते. बॅंकेची स्मरे 485 कोटींची फिक्स्ड डिपॉझिटही शिल्लक राहिली होती.
सीकेपी-बँकेचे मुख्यालय दादर, मुंबई येथे आहे. 2014 मध्ये बँकेच्या तोट्यात वाढ आणि त्याच्या नेट वर्थ मोठी घसरण झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घातली होती. त्यानंतर बँकेचे तोटा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. गुंतवणूकदार-ठेवीदारांनी यासाठी प्रयत्नही केले. त्यांनी व्याज दरात कपात केली. व्याजदर दोन टक्क्यांपर्यंत आणण्यात आला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.