जनधन खात्यांमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार 100 रुपये, सत्य काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खात्यांमधून कॅश काढण्याबाबतच्या तीन बातम्या लोकांसाठी त्रासदायक आहेत. यासंदर्भातील पहिल्या बातमीत असे म्हटले जात होते की, आता सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँका खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्याच्या शुल्कामध्ये वाढ करणार आहेत. दुसर्‍या बातमीत असा दावा केला गेला होता की, जन धन खात्यांमधून कॅश काढण्यासाठी 100 रुपये आकारले जातील. तिसर्‍या बातमीत असा दावा केला गेला होता की, बँक ऑफ बडोदाने कॅश जमा आणि बचत खात्यात पैसे काढण्यावरील शुल्क वाढवले ​​आहे. पण आता पीआयबी फॅक्ट चेकने हे तिन्ही दावे खोटे असल्याचे घोषित केले आहेत. पीआयबीने याबाबत एक ट्विट जारी केले आहे.

पीआयबी ही एक सरकारी संस्था आहे जी वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना भारत सरकारचे धोरण, कार्यक्रमाचे पुढाकार आणि इतर कामगिरीबद्दल माहिती देते. अलीकडेच, पीआयबीने बनावट बातम्यांवर कडक कारवाई करण्यासाठी सत्य तपासणीचे काम सुरू केले आहे. याअंतर्गत दिशाभूल करणार्‍या माहितीची तपासणी केली जाते जेणेकरुन लोकांना योग्य माहिती मिळू शकेल.

पहिल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँकांनी कॅश जमा आणि बचत खात्यात कॅश काढण्यासाठी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा दावा खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या तपासणीनंतर सांगितले आहे. या बँकांनी आपल्या बचत खात्यांमधील कॅश जमा आणि कॅश काढण्याचे शुल्क वाढविण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे.

त्याचप्रमाणे दुसर्‍या एका ट्वीटमध्ये असेही म्हटले गेले आहे की, जन धन खात्यांमधून कॅश काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शन साठी 100 रुपये आकारले जातील.

पीआयबी फॅक्ट चेक म्हणते की, हा दावा खोटा आहे. जनधन खात्यांच्या फ्री बँकिंग सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या संदर्भात आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

तिसर्‍या एका ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, बँक ऑफ बडोदाने कॅश जमा आणि बचत खात्यातून कॅश काढण्यासाठीचा आकार वाढविला आहे.

पीआयबी फॅक्ट चेक म्हणते की, हा दावा खोटा आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या बचत खात्यांमध्ये कॅश जमा आणि कॅश काढण्यासाठीचे शुल्क वाढवले ​​नसल्याची माहिती दिली आहे.

आपण दिशाभूल करणार्‍या बातम्यांविरूद्ध तक्रार देखील करू शकता
सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा बनावट आहे, त्याबद्दल सत्य शोधण्यासाठी आपण PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. PIB Fact Check वर कोणीही बनावट बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल व्हॉट्सअ‍ॅप नंबर 918799711259 पाठवू शकता किंवा [email protected] वर मेल करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.