दिलासादायक! देशातील ७८ जिल्ह्यांत १४ दिवसांत एकही कोरोनाचा पेशंट नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी गुरुवारी माहिती दिली की, देशात कोरोना विषाणूची एकूण संख्या २१,३९३ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या एकूण १०४९ पॉजिटीव्ह घटना घडल्या असून त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह घटनांची संख्या ही २१ हजारांच्या पुढे गेली आहे.ही एक दिलासाची बाब आहे की जागतिक महामारीमुळे आतापर्यंत देशात ४,२५७ लोक बरे झाले आहेत.

भारतीय लोकांमध्ये कोरोना विषाणूची भीती वाढत आहे. संक्रमित रुग्णांची एकूण संख्या २१ हजारने ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमध्ये लॉकडाऊन वाढविण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी कोरोनाशी संबंधित बरिच माहिती आपल्या दैनंदिन अपडेटमध्ये देशाबरोबर शेअर केलेल्या आहेत. ते म्हणाले की, देशभरात कोरोनामुळे एकूण ६८१ मृत्यू झालेले आहेत परंतु आतापर्यंत ४२५७ लोक यातून बरे झाले आहेत, बुधवारी ३८८ अतिरिक्त रुग्ण बरे झाले आहेत.

 

लव्ह अग्रवाल पुढे म्हणाले, जिथे पूर्वी असे ४ जिल्हे होते ज्यामध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नव्हता,आता ही संख्या १२ वर पोहोचली आहे. देशभरात २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात असे ७८ जिल्हे आहेत जिथे गेल्या १४ दिवसांपासून कोणतेही प्रकरण आढळलेले नाही. त्याचबरोबर पर्यावरण सचिव आणि एमपीवर्ड ग्रुप -२ चे अध्यक्ष सीके मिश्रा म्हणाले की २३ मार्च रोजी देशभरात आमच्या १४,९१५ चाचण्या घेण्यात आल्या तर २२ एप्रिल रोजी आम्ही ५ लाखाहून अधिक चाचण्या केल्या आहेत.परंतु आम्हाला माहित आहे की हे पुरेसे नाहीये आणि आम्हाला सतत पुढेच जावे लागेल आणि देशातील चाचण्या वाढवाव्या लागतील.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment