हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत परंतु त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरता पक्ष आहे तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर नाही असं म्हणत ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. भानुदास माळी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
राज्यात महाआघाडी सरकारमध्ये सत्तेचा भागीदार असूनही काँग्रेसची मोठी घुसमट होत आहे. त्याबद्दल पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणूका आम्ही स्वबळावर लढणार आहोत असेही त्यांनी म्हंटल.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. मात्र काँग्रेसच्या वाट्याला आलेली मंत्रिपदं आणि मिळणारा निधी हा राष्ट्रवादी- शिवसेनेला मिळणाऱ्या निधीपेक्षा खूपच कमी असल्याचं भानुदास माळी यांनी म्हटलं आहे.