सोनिया गांधीनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केल्या ‘या’ सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत सध्या कोरोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे देश आर्थिक संकटाला सामोरा जातो आहे. अशात लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली पाहिजे यासाठी सूचना करणारं पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला (MSME) लॉकडाउनचा फटका बसतो आहे. लॉकडाउनमुळे लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला प्रति दिवस ३० हजार कोटींचा तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी १ लाख कोटीचं MSME Wage Protection पॅकेज तातडीने जाहीर करावं अशी सूचना सोनिया गांधींनी पत्रात मोदींना केली आहे. याचसोबत लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला काही अंशी दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनेलघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला १ लाख कोटींचा क्रेडिट गॅरंटी फंडही उभा करावा असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. यासारख्या बऱ्याच सूचना त्यांनी या पत्रात केल्या आहेत.

याआधीही सोनिया गांधी यांनी पत्र लिहून मोदी सरकारला काही सूचना केल्या होत्या. टीव्ही, प्रिंट आणि ऑनलाइन यांना देण्यात येणाऱ्या जाहिराती थांबवा अशी सूचना याआधी सोनिया गांधी यांनी केली होती. जर टीव्ही. प्रिंट आणि ऑनलाइनला देण्यात आलेल्या जाहिराती थांबवण्यात आल्या तर केंद्र सरकार १२५० कोटींची बचत करु शकतं असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.सरकारने सरकारी इमारतींसाठी जे २० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यालाही स्थगिती द्यावी. सध्या संसदेची जी इमारत आहे त्यामध्ये पुढचे अनेक दिवस चांगले काम होऊ शकते अशीही सूचना त्यांनी याआधी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment