ट्रम्पला भारतात आणल्याने कोरोनाल आला, पंतप्रधान मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करा – प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. “तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतेय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवले जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानानी बोलावे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोरोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केलं आहे. एकलकोंडी जीवनास भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली आहे, असाही आरोप प्रकाश आंबडेकर यांनी केला.

कोरोनापेक्षा जास्त लोक टीबीने दगावले होते, टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झालं नव्हतं. कोरोनामुळे लॉकडाऊन झालं त्यामुळे अनेक जण उपाशी आहेत, रोजगार बंद आहेत. सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे, 3 महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे हे मोदींनी सांगितल्याशिवाय कळणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शासनाने आपल्याला ब्लॅकमेल केलं, जीवन उध्वस्त केलंय, 30 तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जीवन जगायला सुरुवात करा, असे माझे आवाहन आहे. आरोग्य विभागाने आम्हाला जगवलं, लॉकडाऊनमुळे नाही, लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रुग्ण झाले, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मोदींवर खुनाचा गुन्हा दाखल करा – आंबेडकर

हे सरकार कंगाल आहे, केंद्र आणि राज्य सरकार भिकारी सरकार आहेत. त्यामुळे जगात तेलाच्या किमती पडलेल्या असताना तेलाचे भाव वाढलेत, ही नवीन चोरी आहे, हे सरकार संघटित गुन्हेगारांचे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला, त्यामुळे कोरोनचा शिरकाव झाला, पंतप्रधानांवर 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा घणाघात आंबेडकरांनी केला. सर्व ठिकाणी पालकमंऱ्यांचा हस्तक्षेपामुळे परिस्थिती बिघडली, जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात अधिकार दिले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.