अमेरिकेत चीनपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू, बळींची संख्या ४००० पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूने जगातील १९० हून अधिक देशांना आपल्या जाळ्यात पकडले आहे. जगातील ४२ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, जगातील सर्वात मोठ्या महासत्तापैकी एक असलेल्या अमेरिकेत गेल्या तीन दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दुपटीने म्हणजेच ४०७६ झाली आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ४,०७६ वर गेली आहे,शनिवारी नोंदविलेल्या आकड्यांपेक्षा ती दुप्पट आहे. शनिवारी मृतांची संख्या २०१० होती.जे कि बुधवारी दुपटीने वाढले.यूएस मध्ये व्हायरसने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या १,८८,५७८ इतकी आहे.

अमेरिकेत मंगळवारी झालेल्या मृतांची संख्या ही चीनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.तथापि, इटली आणि स्पेनमध्ये मृतांचा आकडा जास्त आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची नोंद प्रथम झाली. चीनमध्ये कोरोनामुळे ३००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.त्याचबरोबर इटलीमध्ये मृतांची संख्या १२,४२८ वर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा