हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संक्रमणासह झगडत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या इलाजासाठी लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.काही ठिकाणी या लसीची चाचणीही सुरू झाली आहे.परंतु अद्यापही प्रभावी अशी कोणतीही लस सापडलेली नाहीये. अशा परिस्थितीत कोरोनावर लस सापडली नाही तर काय होईल असा प्रश्न पडतो.
सर्वात वाईट परिस्थितीत जर लस सापडली नाही तर काय होईल? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सीएनएनच्या अहवालानुसार तज्ञ म्हणतात की कोरोनावर जर लस उपलब्ध नसेल तर आपल्या समाजाला कोरोनाच्या संसर्गासह जगणे शिकावे लागेल.
जर लस सापडली नाही तर तुम्हाला कोरोनासह रहायला शिकावे लागेल
अशा परिस्थितीत शहरे हळूहळू खुली केली जातील,थोडेसे स्वातंत्र्य मिळु शकेल पण पूर्णपणे नाही.कोरोनावर लस उपलब्ध नसल्यास कोरोनाची चाचणी आणि शारीरिक ट्रेसिंग हे आपल्या आयुष्याचा एक भागच बनतील.अनेक देशांमध्ये सेल्फ आइसोलेशन देखील जीवनाचा एक भाग असेल. जर यावर लस उपलब्ध नसेल तर त्यावरचे उपचार शोधावे लागतील.परंतु नंतर दरवर्षी या साथीच्या रोगाचा एक युग येईल आणि यामुळे जगभरात कोट्यावधी लोक मरण पावतील.
बरेच देश या लसीच्या चाचण्यामध्ये गुंतले आहेत.परंतु तज्ञ सांगत आहेत की इतक्या लवकर काहीही होणार नाही. सीएनएनशी बोलताना लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील ग्लोबल हेल्थचे प्रोफेसर डॉ. डेव्हिड नाबरो म्हणतात की अद्यापही असे बरेच व्हायरस आहेत,की ज्यांच्या लस आपल्याला सापडलेल्या नाहीत. म्हणूनच,यावर लस उपलब्ध होईल असे आपण म्हणू शकत नाही.आणि ती सापडल्यास त्याला अनेक स्तरांच्या चाचण्या पार कराव्या लागतील.
काही तज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूची लस लवकरच सापडेल. कारण, एचआयव्ही आणि मलेरिया प्रमाणेच,त्याचे विषाणू हे जास्त वेगाने बदलत नाहीत.
एचआयव्ही लस अद्याप सापडली नाही
मात्र,यापूर्वीही असे झाले आहे की एखाद्या व्हायरसवरची कोणतीही लस सापडली नव्हती.अशाच एका घटनेत १९८४ मध्ये अमेरिकेचे आरोग्यमंत्री मार्गारेट हेकलर यांनी वॉशिंग्टनच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले की वैज्ञानिकांनी या व्हायरसचा एक नवीन प्रकार ओळखला आहे. नंतर त्या विषाणूला एचआयव्ही हे नाव पडले.
त्यावेळी असे म्हटले होते की येत्या दोन वर्षांत या विषाणूवरची लस तयार होईल. परंतु सुमारे दोन दशकांनंतर आणि सुमारे २० दशलक्ष लोकांच्या मृत्यूनंतरही एचआयव्हीवरची लस सापडली नाही आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.