आज औरंगाबादेत कोरोनाचा 32 वा बळी, रुग्णसंख्या 1021 वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कालरविवारी दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता याला चोवीस तास उलटत नाहीत तोच सोमवारी मदनी चौक येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा औरंगाबाद येथील 32 वा मृत्यू आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

मदनी चौक येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाला कोरडा खोकला व ताप ही लक्षणे असल्याने त्यांना 13 मे रोजी कटकट गेट नजीक खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला 16 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास खाजगी रुग्णालयातुन घाटीमध्ये गंभीर अवस्थेत दाखल केले होते. त्यांच्यावर कोविड अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना खाजगी रुग्णालयातही व्हेंटिलेटर लावण्यात आला होता.

घाटीतही व्हेंटिलेटरवरच होते तरीही त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सर्वतोपरी उपचार सुरू होते मात्र, 17 मे रोजी रात्री 8 वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. चोवीस तासात हा चौथा तर आतापर्यंतचा औरंगाबादेत येथील 32 वा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू आहे तर कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1021 वर पोहोचली आहे.

काल तीनजणांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू घाटी रुग्णालयात आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये रोशन गेट येथील गल्ली नं. पाच येथील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज मध्यरात्री 1.15 वाजता. तर शंभू नगर, गल्ली नं. 29 येथील 35 वर्षीय महिलेचा सकाळी सहा वा आणि बुड्डी लेन, रौफ कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने सकाळी 9.15 वा. मृत्यू झाल्याचेही कळवले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment