देशात कोरोनाचे ‘हे’ पाच हाॅटस्पाॅट, यात तुमचे राज्य, शहर तर नाही ना? घ्या जाणुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कोरोना विषाणू देशातील प्रत्येक राज्यात पसरला आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक लोक या विषाणूला बळी पडले आहेत आणि ६० हून अधिक लोक मरण पावले आहेत. अशातच काही शहरे आहेत जी कोरोना विषाणूची ‘हॉटस्पॉट्स’ बनली आहेत. म्हणजेच या शहरांमध्ये इतर शहरांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या राज्यांतील काही शहरे आणि क्षेत्रे ओळखली गेली आहेत, जिथे जास्तीत जास्त कोरोना रुग्ण रूग्णालयात दाखल होत आहेत.

महाराष्ट्र आहे सगळ्यांत पुढे
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र कोरोनाव्हायरसचा हॉटस्पॉट बनला आहे. येथे सर्वात रुग्ण आहेत. एकूण ३३५ प्रकरणांपैकी १७४ मुंबईतील आहेत. त्याचवेळी राज्यात १६ लोकांचा मृत्यूही झाला आहे. मुंबईव्यतिरिक्त पुण्यात ३९, सांगलीमध्ये २४, ठाण्यात २०, तर नागपुरात १८ रुग्ण आढळले आहेत.

तामिळनाडू दुबनला दुसरा हॉटस्पॉट
महाराष्ट्रानंतर तामिळनाडू हे देशातील दुसरे राज्य आहे जेथे कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. येथील आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाचे ३०९ रुग्ण आहेत. तामिळनाडूचे २३ जिल्हे कोरोनामुळे बाधित आहेत. जीबी नगरमध्ये सर्वाधिक ४५ प्रकरणे आहेत.एएनआयच्या म्हणण्यानुसार, आज तामिळनाडूमध्ये १०२ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यातील १०० ताब्लीगी जमातमध्ये सहभागी झाले होते.

केरळमधील कासारगोड बनले कोरोनाचे तिसरे हॉटस्पॉट केंद्र
देशातील पहिले कोरोना प्रकरण केरळमध्ये उघडकीस आले. आता केरळमधील १४ जिल्हे आहेत जिथे कोरोनाने उच्चनक गाठला आहे. केरळमधील कासारगोडमध्ये सर्वाधिक ११५ घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

दिल्लीतील सर्वात जास्त रुग्ण कोठे आहे
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, दिल्लीमध्ये आतापर्यंत २१९कोरोना प्रकरणे आहेत.राजधानीमध्ये दक्षिण दिल्ली कोरोनाचा हॉटस्पॉट आहे, जिथे सर्वाधिक ६३ रुग्ण आढळले आहेत.दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी सांगितले की, राजधानीतील कोरोनाची प्रकरणे आता २९३ वर गेली आहेत. या २९३ पैकी १८२ लोक असे आहेत कि जे दिल्लीत जमात मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

राजस्थानमध्ये पहिल्या मृत्यूची पुष्टी
राजस्थानातील ११ जिल्हे कोरोनाव्हायरसने बाधित झाली आहेत. राज्यात आतापर्यंत १३३ कोरोनाचे रुग्ण आहेत. राजस्थानची राजधानी जयपूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. जयपूरमध्ये ३२ प्रकरणे आहेत. जयपूरव्यतिरिक्त भिलवाडा येथे २९आणि झुंझुनू-जोजपूरमध्ये ८-८ प्रकरणे आहेत. राजस्थानमध्येही तीन रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे येथे अद्याप कोणाचा मृत्यू झालेला नाही, परंतु कोरोनो विषाणूमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची राजस्थान सरकारने शुक्रवारी पुष्टी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे