आफ्रिदीचं कौतुक केल्यामुळे भज्जी आणि युवी झाले ट्रोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना या कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे.सगळे देश आपापल्या विविध पद्धतीने उपाययोजना करून या व्हायरसशी लढा देत आहे.डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही कोरोनामुळे अवघड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला सध्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे.पाकिस्तानातील बहुतांश लोकांचा रोजगार हा रोजंदारीवर असल्यामुळे लॉकडाउन करणं शक्य नसल्याचं पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं.अशा परिस्थितीत माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आपली जबाबदारी ओळखून गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्याचे वाटप करत आहे.त्या संदर्भातील फोटो आणि अपडेटदेखील ट्विटरवरून तो सर्वांना देत आहे.

पाकिस्तानात तो जे काम करत आहे, त्या कामाची स्तुती होत आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी फलंदाज युवराज सिंग यांनीही त्याच्या या कामाचे कौतुक केले आहे. त्या दोघांनी ट्विट करत आफ्रिदी करत असलेल्या कामाचे कौतुक केले असून त्याला या कार्यात मदत करण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे.

मात्र आफ्रीदीला मदत करण्याचा सल्ला देणं या दोघांना चांगलंच महागात पडलं आहे. नेटिझन्सनी या दोघांना या प्रकारावरून फैलावर घेतल्याचं दिसून आले आहे.

 

 

 

 

 

दरम्यान, आफ्रिदीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि कोरोनामुळे पाकिस्तानमधल्या सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली होती. अनेकांना अन्नधान्य, सॅनेटायजर, टिश्यू या सारख्या गोष्टी मिळत नसल्याचं आफ्रिदीने सांगितलं.यामुळेच आपण आपल्या लगतच्या खेड्यांमध्ये मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचं आफ्रिदीने सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा