सरकारनं संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा वेगळी पावलं उचलावी; राहुल गांधींचा मोदींना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. राहुल गांधी लिहलं आहे कि, , मोदी सरकारला याबाबत विचार करायला हवा की, देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच लोकांवर, आपल्याच समाजावर आणि आपल्याच अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे आपल्याला इतर देशांपेक्षा वेगळ्या पद्धतीचं पावलं उचलणं गरजेची आहेत.

राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याऐवजी गरिबांच्या हिताची काही पावलं उचलायला हवीत. कारण, लॉकडाऊननंतरच देशातील सर्वच भागातील गरिबांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या बातम्या येत आहेत. शनिवारी संध्याकाळी तर दिल्लीतील आनंद विहार येथे आपल्या घरी परतणाऱ्या मजूर-कामगार लोकांची गर्दी उसळली होती. यापूर्वी दिल्ली-गाजियाबाद सीमेवर शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. जे आपल्या घरी पायीच निघाले होते. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा सरकारनं वेगळी पावलं उचलायला हवीत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या संकटसमयी आम्ही सरकारच्यासोबत आहोत. सरकारसोबत राहून आम्ही या आव्हानाचा सामना करु, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, सरकारकडून मदत पॅकेज जाहीर करणे ही पहिली योग्य पायरी आहे. परंतु हे पॅकेज लोकांपर्यंत जलद पोहोचणे सर्वात महत्वाचे आहे. ते म्हणाले की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही आहे व त्यामुळं त्यांना घरमालकाला घराचे भाडे देता येत नाही. यामुळे ते गावाकडे जात आहेत. अशा परिस्थितीत सरकारने त्यांना मदत करून जाहीर केलेल्या आर्थिक मदतीत भाड्याची रक्कम सुद्धा त्यांच्या खात्यात जमा करण आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment