हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात प्रसार झालेल्या कोरोना या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी प्रत्येक देश हा त्याच्यावरील लसीच्या शोध घेण्यात गुंतला आहे. यादरम्यानच, अमेरिकेतून नुकतीच एक चांगली बातमी समोर आली आहे. जेथे पहिल्यांदाच माणसांवर घेण्यात आलेली कोरोनाच्या लसीची चाचणी पॉजिटीव्ह आलेली आहे. या लसीची निर्मिती करणार्या मोडर्ना या कंपनीने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. मोडर्ना कंपनीने याबद्दल सांगितले की,’ आम्ही ज्या रुग्णांवर या एमआरएनए लसीची ( mRNA vaccine) चाचणी घेतली त्यांच्या शरीरात अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. तसेच या लसीचे साईड इफेक्टही अगदी कमी प्रमाणात दिसून आलेले आहेत, ही एक अत्यंत चांगली बातमी आहे.’
सोमवारी, मोडर्ना यांनी घेतलेल्या या चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील निकाल स्पष्ट केला आहे ज्याबद्दल त्यांनी सांगितले की,’ जीन -१२७३ ही लस ज्या रुग्णांना दिली गेली होती, त्यांच्या शरीरात या लसीचे साईड इफेक्टस अगदी कमी प्रमाणात दिसले.त्यामुळे ही लस सुरक्षितही असल्याचे भासत आहे. मोडर्ना यांनी याबाबत आणखी माहिती दिली की,’ ज्या रुग्णांवर ही लस वापरली गेली आहे ते कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रूग्णांपेक्षा अधिक ताकदवान असल्याचे आढळले आहे.
कोरोना लस बनविणारी मोडर्ना ही पहिलीच अमेरिकन कंपनी आहे जिने कोरोनावर लस बनविण्याच्या शर्यतीत असलेल्या इतर कंपन्यांवर मात केली आहे. या कंपनीने ही लस विकसित करण्यासाठी आवश्यक असणारा मूळ जेनेटिक कोड मिळवण्यापासून ते त्याची मनुष्यांवरील चाचणी घेण्यापर्यंत सर्व गोष्टी या ४२ दिवसांतच पूर्ण केल्या आहेत. या लसीची चाचणी ही प्राण्यांआधी माणसांवरच केली गेली. दोन मुलांची आई असलेल्या ४३ वर्षीय जेनिफर नावाच्या एका महिलेवर १६ मार्चला ही लस पहिल्यांदा वापरली गेली. खरं तर, या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये १८ ते ५५ वर्षे वयोगटातील सुमारे ४५ रुग्णांचा समावेश होता. ज्यामध्ये सुरुवातीला फक्त ८ लोकांना ही लस दिली गेली.
मोडर्ना च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की,’ ही लस कमी प्रमाणात वापरल्यानंतर या लसीने चांगले परिणाम दाखवले आहेत. यामुळे, कंपनी आता या निकालांच्या आधारे त्याच्या पुढील चाचण्यांवर काम करण्याचा विचार करीत आहे. तसेच अभ्यासानंतर मिळालेल्या डेटाच्या आधारे, या लसीच्या सुरुवातीच्या काळात त्याचे काही साईड इफेक्ट देखील समोर आले होते. जसे लस टोचलेली जागा लालसर होणे आणि ती जागा थंड वाटणे. या शिवाय, सर्व डेटावरून आम्हाला असा विश्वास वाटू लागला आहे की एमआरएनए -१२७३ या लसीमध्ये कोरोना विषाणूला रोखण्याची क्षमता आहे.’
ही बातमी बाहेर आल्यानंतर वॉल स्ट्रीटमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले आणि एस अँड पी ५०० यूएस बेंचमार्क इक्विटी निर्देशांकात दुपारच्या व्यापारात ३% वाढ दिसून आली. यासह, मोडर्नाच्या शेअर्स मध्ये अंदाजे ३०% वाढ झाली असून, त्याच्या शेअरची किंमत ही ६६ डॉलर वरुन ८७ डॉलर्सवर गेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.