नवी दिल्ली । कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वयोगटाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धक्कादायक माहिती आज जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहिल्यास देशात ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 430 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वयोगटाचा विचार केल्यास 0 ते 45 या वयोगटातील मृतांचे प्रमाण 14 टक्के आहे. तर 45 ते 60 या वयोगटातील मृतांचे प्रमाण 10.30 टक्के आहे. तर ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण तब्बल 75 टक्के आहे. मृतांमध्ये 60 ते 75 या वयोगतील 33 टक्के आणि 75 वर्षांवरील 42 टक्के व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा आकडा 14 हजार 378 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशातील मृतांची एकूण संख्या ४८० इतकी झाली आहे. करोनाचे एकूण १९९२ रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील २३ राज्यांमधील ४७ जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. तर इतर ४५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. हे असे जिल्हे आहेत जिथे सुरुवातीला करोनाचे रुग्ण आढळून आले होते.
देशातील एकूण १४ हजार ३७८ रुग्णांपैकी ४ हजार २९१ रुग्ण (२९.८ टक्के) हे निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझशी संबंधित आहेत. २३ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये तबलीघीचे रुग्ण आहेत. यातील ८४ टक्के रुग्ण तामिळनाडूत, दिल्लीत ६३ टक्के, ७९ टक्के तेलंगण, ५९ टक्के उत्तर प्रदेश आणि ६१ टक्के आंध्र प्रदेशात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”