हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बनावट नोटांचा कारभार करणारे एक रॅकेट नुकतेच पुणे येथे उघडकीस आले आहे. बुधवारी “चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया”च्या नावाची डमी बिले आणि यूएस डॉलरसह सुमारे ४७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी याविषयी सांगितले की, या प्रकरणात भारतीय सैन्याच्या एका शिपायासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बच्चन सिंह म्हणाले की,’ आता या नोटांची तपासणी केली जात आहे, मात्र बर्याच नोटांमध्ये ”चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाची”ची डमी बिले वापरली आहेत.
शेख अलीम गुलाब खान (सैन्य जवान), सुनील बद्रीनारायण सारडा, रितेश रत्नाकर, तुफैल अहमद मोहम्मद इशाक खान, अब्दुल गनी रहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गनी खान अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या मोजणीत ४३.४ कोटी रुपये बनावट भारतीय चलन आणि ४.२ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे चलन मिळाले आहेत.
पुणे पोलिस गुन्हे शाखेचे डीसीपी बच्चन सिंह म्हणाले,’ दोन दिवसांपूर्वीच आम्हाला एमआयकडून याविषयीची माहिती मिळाली होती, त्या आधारे आम्ही हे संयुक्त ऑपरेशन केले. त्याअंतर्गत आम्ही बुधवारी सहा जणांना अटक केली. आरोपींची भारत तसेच इतरही अनेक देशांच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत. ते म्हणाले, ‘अटक केलेल्या या सहा आरोपींपैकी एक लष्करातील शिपाई आहे. तोही या प्रकरणातील आरोपी आहे.
या बनावट नोटांचा स्रोत शोधण्यासाठी सध्या चौकशी सुरू असल्याचे डीसीपीनी सांगितले. पुणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे पोलिस आणि सैन्याच्या दक्षिणी कमांड इंटेलिजन्स युनिटने केलेल्या या संयुक्त कारवाईत पुण्यातील विमान नगर या भागात छापा टाकून या टोळीचा पर्दाफाश केला. बच्चन सिंह पुढे म्हणाले की,’ या टोळीचे सदस्य अस्सल म्हणून बनावट नोटा देऊन लोकांची फसवणूक करत असत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.