बीड : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना बीडच्या शिरूर कासार न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ (chitra wagh) यांना शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
चित्रा वाघ (chitra wagh) या शिरूर कासार दौऱ्यावर असताना त्यांनी 18 जुलै 2021 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणी महेबूब शेख यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी शिरूर कासार पोलीस ठाण्यात चित्रा वाघ (chitra wagh) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
कोर्टाकडून समन्स जारी
महेबूब शेख यांनी शिरूर कासार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने शिरूर कासार पोलिसांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी दि.9 डिसेंबर 2022 रोजी चित्रा वाघ (chitra wagh) यांच्याविरोधात भादंवी 500, 499 अन्वये समन्स जारी केले आहे. या समन्सनुसार आता चित्रा वाघ यांना 8 फेब्रुवारी 2023 ला शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या