‘या’माजी भारतीय गोलंदाजाचा सनसनाटी खुलासा म्हणाला,’ होय वर्णभेदाला बळी पडलोय…’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेशने एक खळबळजनक खुलासा केला आहे. आपल्या खेळाच्या दिवसांत आपल्याला वर्णद्वेषी कमेंट्सना सामोरे जावे लागले असे गणेश म्हणाले. मात्र याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि तो देश तसेच आपल्या राज्याकडून खेळतच राहिला. डोडा गणेशने भारताकडून चार कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. १९९७ मध्ये त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो म्हणाला की,’ दोन वर्षांपूर्वी अभिनव मुकुंदने वर्णद्वेषाबद्दल केलेल्या खुलाश्यानंतर त्याला आपल्या खेळण्याच्या दिवसात तो काय करीत होता याचा विचार करण्यास प्रवृत्त केले.

कर्नाटककडून गणेशने १०० रणजी सामने खेळले आहेत आणि ३६५ बळी घेतले आहेत, तसंच २ हजार २३ धावाही केल्या आहेत. या ४६ वर्षीय खेळाडूने २००७ मध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि प्रशिक्षक म्हणून काम करू लागला.

racial abuse,cricket, sports news, indian cricket team, Dodda Ganesh, Abhinav Mukund, नस्‍लवाद, रंगभेद, क्रिकेट, डोडा गणेश, अभिनव मुकुंद, भारतीय क्रिकेट टीम

अभिनव मुकुंद याचे एक जुने पत्र सोशल मीडियावर शेअर करताना डोडा गणेशने असा खुलासा केला की, अभिनव मुकुंदच्या कथेने मला माझ्या खेळण्याच्या दिवसात आलेल्या वर्णद्वेषी कमेंटची आठवण करून दिली. यासाठी एक भारतीय दिग्गजही साक्षीदार होता. यामुळे मी स्ट्रॉंग बनलो आणि भारत तसेच कर्नाटककडून १०० सामने खेळण्यापासून मला कोणीही रोखू शकले नाही. गणेश म्हणाला की, ‘त्यावेळी आपल्याला वंशविद्वेष म्हणजे काय ते समजत नव्हते आणि भविष्यात कोणत्याही भारतीयांनी यातून जावे अशी त्यांची इच्छा नाही.’

२०१७ मध्ये श्रीलंकेच्या दौर्‍याचा एक भाग असलेला अभिनव मुकुंदने त्यावेळी सोशल मीडियावर म्हटले होते की, कातडीच्या रंगामुळे त्याला कित्येक वर्षांपासून अपमान सहन करावा लागत आहे. गोरा रंग केवळ मोहक किंवा देखणा नाही. तुमचा रंग काहीही असो, त्याला सोयीस्कर बनून काम करा. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की,लहानपणापासूनच त्याच्या त्वचेच्या रंगाबद्दल लोकांची वृत्ती त्याला आश्चर्यचकित करते. तो म्हणाला की, जो कोणी क्रिकेट पाहतो त्याने हे समजलेच पाहिजे कि तो रणरणत्या उन्हात खेळला आहे आणि त्यामुळे त्याचा रंग काळा झाला आहे, याचे त्याला कसलेही दुःख नाही. त्याने लिहिले की, त्याला जे आवडेल ते तो करीत आहे. तो देशातील सर्वात गर्मीचा भाग असलेल्या चेन्नईमध्ये राहणारा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.