राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूची स्पर्धेतून माघार

Rajstan Royals
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाची आयपीएल कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता उर्वरित आयपीएल सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील 31 सामने अजून बाकी आहेत. उर्वरित सामन्यामध्ये दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे आयपीएल टीमची डोकेदुखी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक दिग्गज खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत. यामध्येच आता राजस्थान रॉयल्सच्या दिग्गज क्रिकेटपटूने उर्वरित स्पर्धेतून माघार घेण्याची घोषणा करत टीमला मोठा धक्का दिला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या बॅटींगचा प्रमुख आधार असलेला आक्रमक बॅट्समन जोस बटलर याने आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. जोस बटलर म्हणाला कि, “आयपीएल स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्या तारखा एक नसतात. जर दोन्ही स्पर्धा एकाच काळात असतील तर इंग्लंडकडून खेळण्याला प्राधान्य असेल. आयपीएलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूनं खेळावं की नाही याचा निर्णय ईसीबीचे क्रिकेट संचालक एश्ले जाईल्स यांनी घ्यावा असे जोस बटलरने सांगितले आहे.

तसेच “जाईल्स सांगतील त्या ठिकाणी आम्ही खेळू. मला जास्तीत जास्त क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. पण तुम्ही सर्व गोष्टींसाठी एकाच वेळी उपलब्ध राहू शकत नाही. या प्रश्नाला काही उत्तर नाही. आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहे, यापुढे देखील खेळणार आहोत.” असेदेखील जोस बटलरने स्पष्ट केले आहे.