हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीमुळे जगभरात सर्व प्रकारच्या खेळाचे उपक्रम थांबलेले आहेत त्यामुळे सर्व खेळाडू घरीच बसले आहेत. दरम्यान, क्रिकेटची पांढरी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या बोर्डाने नुकतीच आपली प्लेइंग इलेव्हन टीम जाहीर केली आहे. खरं तर, या मैदानावर गोलंदाजी करताना ५ बळी किंवा शतक ठोकणार्या खेळाडूंचा लॉर्ड्सच्या ‘ऑनर्स बोर्ड’ मध्ये समावेश केला जातो. या कारणास्तव अनेक दिग्गजांचा या बोर्डामध्ये समावेश आहे, पण आता लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने अशा ११ खेळाडूंची प्लेइंग लिस्ट तयार केली आहे कि ज्यांनी जगातील प्रत्येक मैदानावर शानदार कामगिरी केली पण लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर मात्र त्यांची बॅट शांतच राहिली आहे. यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अॅडम गिलख्रिस्ट, वसीम अक्रम या दिग्गजांची नावे आहेत.
लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या ऑनर्स बोर्डमध्ये सामील न झालेल्या या खेळाडूंच्या टीमचा कर्णधार इंग्लंडचा माजी फलंदाज डब्ल्यूजी ग्रेस आहे. त्याने आपल्या २२ कसोटी सामन्यात १०९८ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यानंतर वीरेंद्र सेहवागचा क्रमांक लागतो. सेहवागने एकूण २३ कसोटी शतके ठोकली, पण लॉर्ड्समध्ये त्याला एकही शतक करता आलेले नाही. कारकीर्दीत तीन वेळा इंग्लंड दौर्यावर आलेल्या विराट कोहलीने अद्यापही या मैदानावर शतक झळकावलेले नाही. त्यामुळे त्यालाही या संघात स्थान देण्यात आले आहे.
Some of cricket’s greatest ever players do not appear on the famous Lord’s Honours Boards.
How do you think this Non-Honours Board XI would go? ???? #LoveLords pic.twitter.com/uWey8QNE9c
— Lord’s Cricket Ground (@HomeOfCricket) May 26, 2020
त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचा क्रमांक लागतो. सचिनने लॉर्ड्स येथे पाच सामने खेळले, परंतु तो येथे जास्तीत जास्त केवळ ४७ धावाच करू शकला. तर, दुसरीकडे लाराने लॉर्ड्स येथे तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्याची येथील सर्वाधिक धावसंख्या ही ५४ होती.
यानंतर जॅक कॅलिसचे नाव येते. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असलेल्या कॅलिसने येथे कधीही शतक केले नाही किंवा त्याने पाच विकेटसही घेतलेल्या नाहीत.
ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. दुसर्या सर्वांत जास्त विकेट घेणारा शेन वॉर्न (७०८), वसीम अक्रम (४१४ विकेट) हे देखील लॉर्ड्सवर पाच विकेट घेण्यास असमर्थ ठरले. या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली आणि वेस्ट इंडिजचा कर्टली अॅम्ब्रोसचाही समावेश आहे.
ऑनर्स बोर्ड ऑफ लॉर्ड्समध्ये कधीही नाव न येणाऱ्या या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन: डब्ल्यूजी ग्रेस (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विराट कोहली, जॅक कॅलिस, अॅडम गिलख्रिस्ट (विकेटकीपर), शेन वॉर्न, वसीम अक्रम, डेनिस लिली, कर्टली अॅम्ब्रोस.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.