मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियामध्ये सध्या T- 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेतील क्वॉलिफायर राउंड पूर्ण झाला असून, त्यामुळे पुढील फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामुळे आता पुढील स्पर्धा रंगतदार होणार हे मात्र नक्की. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर शेन वॉटसनने (shane watson) भारताच्या एका खेळाडूबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला वॉटसन?
शेन वॉटसनने भारताच्या हार्दिक पंड्याबाबत हे मोठे वक्तव्य केले आहे. “हार्दिक एक प्रतिभावान क्रिकेटर आहे. तो ज्या प्रकारे 140 किलोमीटर प्रतितास वेगाने बॉलिंग करतो, ते विलक्षण आहे. त्याच्याकडे केवळ उत्कृष्ट कौशल्यच नाही तर विकेट घेण्याची आणि रनचा बचाव करण्याची उत्तम क्षमतादेखील आहे.” असे शेन वॉटसन (shane watson) म्हणाला. हार्दिक सध्या चांगली कामगिरी करत आहे. तो पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. असेदेखील तो पुढे म्हणाला.
उत्तम फिनिशर!
हार्दिक पंड्याचा बॅटिंग फॉर्म सध्या चांगला आहे. तो केवळ फिनिशरच नाही तर पॉवर हिटरही आहे. त्याच्याकडे सर्व कौशल्यं आहेत. गेल्या आयपीएलमध्ये आपण सर्वांनी हे पाहिले आहे. तो एकटाच T – 20 वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो. तो खऱ्या अर्थाने मॅच विनर खेळाडू आहे.’ असे मोठे वक्तव्य शेन वॉटसनने (shane watson) केले आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती