विस्डेन इंडियाने शेअर केलेला फोटो पाहून सौरव गांगुली हरवला भूतकाळात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण एकत्र खेळत असताना टीम इंडियाच्या फँटास्टिक फोरला कोण विसरू शकतो. हे चारही जण जेव्हा भारतीय टीम मध्ये एकत्र खेळायचे तेव्हा विरोधी संघातील गोलंदाजांची परिस्थिती बिकट व्हायची.एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसर्‍या फलंदाजाला बाद करण्यासाठीही त्यांना खूप कष्ट करावे लागले. आता विस्डेन इंडियाने या चारही खेळाडूंचे एक छायाचित्र शेअर करून आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा जिवंत केले आहे.

विस्डेन इंडियाचे हे छायाचित्र पाहून गांगुलीही भूतकाळात हरवून गेला.हे छायाचित्र शेअर करताना विस्डेन इंडियाने लिहिले की, ‘आइकॉनिक क्वार्टरेट, वी विल वेट अर्थात फॅन्टेस्टिक फोर, आम्ही वाट पाहतोय.

 

गांगुलीने या फोटोला लाइक्स बरोबर उत्तरही दिले, “आयुष्यातील सर्वोत्तम वेळ .. प्रत्येक आलेल्या क्षणांचा आनंद लुटला.”

 

 

गांगुली त्यावेळी संघाचा कर्णधार होता आणि त्यावेळी या चार फलंदाजांच्या क्रमाची नोंद सर्वकालिन महान फलंदाजीच्या क्रमवारीत केली जाते. या चार फलंदाजांनी मिळून २,१५१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि १,००,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment