मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्याच्या १८ जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. टीम इंडियाला आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याचा फायदा न्यूझीलंडचा दिग्ग्ज अनुभवी बॅट्समन रॉस टेलर याने व्यक्त केला आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यामुळे विराट कोहलीच्या टीमला इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. असे मत रॉस टेलरने व्यक्त केले आहे. कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल स्थगित करण्यात आली.
काय म्हणाला रॉस टेलर
“आयपीएल स्पर्धा दुर्दैवाने स्थगित झाली. त्याचा टीम इंडियाला फायदा होईल. ही स्पर्धा नियोजित वेळेत संपली असती तर त्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळाला असता. आता त्यांच्याकडे बराच वेळ आहे. त्यांच्या बॉलर्सला याचा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी फायदा होईल.” असे मत रॉस टेलर याने व्यक्त केले आहे. न्यूझीलंडची टीम जून महिन्यात इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट मॅच खेळणार आहे. पण रॉस टेलर सध्या सर्वात जास्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार करत आहे. “मी WTC फायनलबद्दल विचार करत नाही, असे म्हणालो तर ते खोटं असेल. ही मॅच एका तटस्थ ठिकाणी होणार आहे. आम्हाला दोन टेस्ट खेळल्याने फायदा होईल. मात्र टीम इंडिया बराच काळापासून नंबर 1 आहे,” याची आठवण देखील रॉस टेलरने करून दिली.
तसेच “आयपीएल ही कदाचित सर्वात मोठी लीग आहे. दुसऱ्या देशाकडे इतके सामर्थ्य नसेल तोपर्यंत ते आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाचा विचार करुन कार्यक्रम तयार करतील. कारण, क्रिकेटपटूंना या लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अजूही पहिलं प्राधान्य आहे, सर्व गोष्टी नियंत्रणात आहेत, तोपर्यंत ठीक आहे, ” असे मत रॉस टेलर याने व्यक्त केले आहे.